कर्जबाजारीपणाला कंटाळून अख्ख्या कुटुंबाने केले विष प्राशन

कर्जबाजारीपणाला कंटाळून अख्ख्या कुटुंबाने केले विष प्राशन

Crime story's
बिहार/पटणा - नवादा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे फळविक्रेते केदारलाल गुप्ता यांचे शहरातील विजय बाजारात दुकान होते, मात्र गुप्ता यांच्यावर 10 ते 12 लाखांचे कर्ज होते, कर्ज परत करण्यासाठी अनेकांनी तगादा लावला होता. bihar crime
ज्यांच्याकडून गुप्ता यांनी कर्ज घेतले ते पैसे लवकर परत मिळावे यासाठी अनेक प्रयत्न करीत होते, गुप्ता यांनी कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ मागितला मात्र त्यांना वेळ दिला नाही, त्यामुळे त्यांची मानसिक स्थिती ढासळत चालली होती.
नैराश्येपोटी अख्ख्या गुप्ता कुटुंबांनी विष प्राशन केले, यामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला तर 1 मृत्यूशी झुंज देत आहे. Loan

बुधवारी रात्री उशिरा गुप्ता यांनी पत्नी आणि चार मुलांसह विष प्राशन केले. या घटनेत कुटुंबातील पाच सदस्यांचा मृत्यू झाला. तर एका मुलीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Suicide attempt

मृतांमध्ये कुटुंबप्रमुख केदार लाल गुप्ता, पत्नी अनिता कुमारी आणि तीन मुले प्रिन्स कुमार, शबनम कुमारी आणि गुडिया कुमारी यांचा समावेश आहे, तर मुलगी साक्षीची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. debt market

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली, केदारलाल गुप्ता यांना उपचारासाठी नेण्यात आले असता वाटेतच त्यांनी प्राण सोडले.

गुप्ता यांचा मुलगा प्रिन्सने विष प्राशन करण्यापूर्वी एक व्हिडिओ बनवला होता. या व्हिडिओमध्ये प्रिन्सने म्हटले आहे की, बाजारातून काही लोकांकडून कर्ज घेतले होते आणि ते आम्हाला खूप त्रास देत होते.

आम्ही पैसे परत करण्यासाठी थोडा वेळ मागितला. पण लोक ते मानायला तयार नव्हते आणि वारंवार धमक्या देत होते. यामुळे सर्वांनी विष प्राशन केले.

याप्रकरणात पोलिसांनी 3 आरोपींना आत्महत्येस परावृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करीत अटक केल्याची माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने