चोरट्यानी SBI ATM सेंटर फोडले

चोरट्यानी SBI ATM सेंटर फोडले

Crime story's
नांदेड - गजबजलेल्या भागातील मुख्य मार्गावर स्थित SBI बँकेचे ATM अज्ञातांनी फोडत त्यामधील 25 लाख 89 हजार रुपयांची रोख रक्कम पळवली. Nanded crime
मध्यरात्री 2 ते 3 वाजता ही धाडसी चोरी पोलिसांसमोर आव्हानात्मक गुन्हा ठरला आहे.
मालेगाव रोडवरील स्थित भाग्यनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेले SBI ATM फोडल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. Robbery
चोरांनी चोरी यशस्वी करण्यासाठी Jeep चा वापर केला, चोरीची घटना सकाळी उघडकीस आल्यावर पोलीस श्वान पथकासहित मोठा फौजफाटा घेत घटनास्थळी दाखल झाले. Maharashtra crime news सध्यातरी याबाबत पोलिसांना काही सुगावा लागलेला नाही.
जिल्हा पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षक नुकतेच रुजू झाले, त्यांनी तात्काळ गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी सदर प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेला निर्देश दिले आहे.




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने