शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या हातावर चालवली ड्रिल मशीन

शिक्षकाने विद्यार्थ्यांच्या हातावर चालवली ड्रिल मशीन

News34 chandrapur
उत्तरप्रदेश - कानपुर मधील एका खासगी शाळेतील शिक्षकाने क्रूरतेची सीमा गाठत विद्यार्थ्याने दोनचा पाढा विसरल्याने त्याच्या हातावर चक्क ड्रिल मशीन चालविल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
विद्यार्थ्यांचा सर्वात मोठा गुरू म्हणजे शिक्षक, आयुष्याच्या वळणावर नेमकं कुठं जायचं याची शिकवण देणारा शिक्षक हा मोठा गुरू असतो.

सदर पीडित विद्यार्थी हा कानपुर जिल्ह्यातील सिसामऊ भागातील रहिवासी असून तो प्रेमनगर भागातील उच्च प्राथमिक शाळेतील पाचव्या वर्गात शिकतो.
घटनेची माहिती मिळताच पीडित विद्यार्थ्यांचे नातेवाईक शाळेत पोहचले, त्यानंतर त्यांनी शाळेत गोंधळ माजवला.
पोलिसांना याबाबत माहिती मिळताच पोलीस शाळेत दाखल झाले, विद्यार्थ्याला याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्याने घडलेला प्रसंग सांगितला.
शाळेत आल्यावर मला शिक्षकाने दोन चा पाढा विचारला मला तो बरोबर म्हणता आला नसल्याने शिक्षक रागावले त्यांनी रागाच्या भरात माझ्या हातावर ड्रिल मशीन चालवली, त्याचवेळी दुसऱ्या विद्यार्थ्याने तात्काळ ड्रिल मशीनचे बटन बंद केले.
जर दुसऱ्या विद्यार्थ्याने बटन बंद नसते केले तर मोठा अनर्थ घडला असता, विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून त्यावर उपचार करीत घरी पाठविण्यात आले.
या संपूर्ण प्रकाराबाबत शिक्षणाधिकारी यांना माहिती देण्यात आली असून शिक्षणाधिकारी सुजित कुमार यांनी यावर समिती स्थापन केली आहे.
समितीचा अहवाल प्राप्त होताच शिक्षकावर कारवाई करणार असेही त्यांनी जाहीर केले.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने