कुऱ्हाडीने वार करीत पतीने केले पत्नीचे 2 तुकडे

कुऱ्हाडीने वार करीत पतीने केले पत्नीचे 2 तुकडे

Crime story's
मध्यप्रदेश - देशातील श्रद्धा वालकर क्रूर हत्याकांड प्रकरण ताजे असतांना मध्यप्रदेशातील शहडोलमध्ये असेच एक क्रूर हत्याकांडाची घटना उघडकीस आल्याने चांगलीच खळबळ माजली आहे.

Madhya pradesh crime news
एका व्यक्तीने पत्नीची हत्या करीत तिचे तुकडे करून जंगलातील विविध भागात फेकले, राम किशोर पटेल याला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. या संशयावरून त्याने पत्नीचा खून केल्याची बाब पोलीस तपासात समोर आली आहे.
आरोपीने 13 नोव्हेंम्बरला भाऊ व पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती, पोलीस सदर प्रकरणाचा तपास करीत असताना 15 नोव्हेंम्बरला गावाजवळील जंगलात महिलेचे कपडे मिळाले होते, सदर कपडे आरोपी राम पटेल यांच्या पत्नीचे होते. Brutal murder
पोलिसांनी त्या आधारे तपास सुरू केला असता जंगलात महिलेचे धड व शरीर मिळून आले, त्यांनतर हे क्रूर हत्याकांड उघडकीस आले.
आरोपीने पत्नीवर कुऱ्हाडीने वार करीत 2 तुकडे केले त्यानंतर जंगलात पत्नीचे धड व शीर पुरविले, राम ला पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता म्हणून त्याने पत्नीची हत्या केली असल्याची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपी राम ला अटक केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने