शाळेत 10 मिनिटे उशिरा येण्याची भयावह शिक्षा

शाळेत 10 मिनिटे उशिरा येण्याची भयावह शिक्षा

Crime story's
दिल्ली - शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचल्याने शिक्षकाने विद्यार्थ्याला बेदम मारहाण केली, या मारहाणीमुळे विद्यार्थी थेट व्हेंटिलेटरवर पोहचला.
ही संतापजनक घटना फरिदाबाद येथील DPS सेक्टर 11 मधील शाळेत घडली.
अपूर्वा सिंह असे त्या विद्यार्थ्यांचे नाव असून तो इयत्ता 12 वी मध्ये शिकतो. Delhi crime
पीडित मुलाच्या नातेवाईकांनी सांगितले की अपूर्वा हा शाळेत 10 मिनिटे उशिरा पोहचला होता, त्यामुळे चिडलेल्या लोकेश नामक शिक्षकाने अपूर्वा ला बेदम मारहाण केली, मारहाणीनंतर अपूर्वा ची तब्येत खालावली त्याला दिल्ली येथील होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शाळेची मान्यता तात्काळ रद्द करावी अशी मागणी अपूर्वा च्या कुटुंबीयांनी केली आहे.
याबाबत पोलिसात तक्रार झाली असून शाळा व्यवस्थापनाने चौकशी होईपर्यंत लोकेश नामक शिक्षकाला निलंबित केले आहे. Beating student
लोकेश ने अपूर्वा ला मारहाण केल्याचे पीडित मुलांच्या नातेवाईकपुढे कबुल केले मात्र अपूर्वा हा अभ्यासात कमकुवत असल्याने त्याला मारहाण केल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.
काही वेळासाठी अपूर्वा हा व्हेंटिलेटरवर होता सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने