मुलाने केली कुटुंबातील चौघांची हत्या

मुलाने केली कुटुंबातील चौघांची हत्या

Crime story's
दिल्ली - देशाची राजधानी दिल्ली मध्ये पुन्हा एक क्रूर हत्याकांड घडले, एकाच कुटुंबातील 4 जणांची हत्या करण्यात आल्याने पालम भागात चांगलीच खळबळ उडाली.

मंगळवारी रात्री 10 वाजता नंतर राज नगर 2 मधील एका घरात 4 जणांचे मृतदेह मिळाले, एका मुलाने 2 बहिणी, वडील व आजीची हत्या केल्याची थरारक बाब उघडकीस आली. Delhi police
मुलाने हे हत्याकांड घडवून आणल्याची माहिती मिळाली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. Delhi crime
आरोपी मुलाला अंमली पदार्थांचे अति व्यसन होते, काही दिवसांपूर्वी तो व्यसनमुक्ती केंद्रातून आला होता, मंगळवारी रात्री कुटुंबियांसोबत त्याचा वाद झाला, रागाच्या भरात मुलाने चौघावर चाकूने हल्ला चढवीत ठार केले.
इतकेच नव्हे तर कुटुंबातील चौघांची हत्या केल्यावर त्याने पळ काढला नाही, तो मृतदेहाजवळ बसून राहिला. India crime news
कुटुंबियांसोबत कोणत्या गोष्टीवरून वाद झाला याबाबत पोलीस तपास करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने