क्राईम पेट्रोल मालिकेची प्रेरणा घेत बापाने दिली मुलीला फाशी

क्राईम पेट्रोल मालिकेची प्रेरणा घेत बापाने दिली मुलीला फाशी

Crime storys
नागपूर / कळमना - सर्वात जास्त गुन्हेगारी जगतात प्रसिद्ध असलेली टीव्ही मालिका crime patrol ला बघून एकाने थक्क करणारा गुन्हा केला आहे.
एका निर्दयी बापाने 6 वर्षाच्या मुलीला सोबत घेत मोठी 16 वर्षीय मुलीला गळफास लावण्यास प्रवृत्त केले, यामध्ये मुलीचा मृत्यू झाला आहे.
कळमना येथील राहणारे 40 वर्षीय गुड्डू छोटेलाल रज्जक असे त्या निर्दयी बापाचं नाव आहे.
मुलीने आत्महत्या केली असा गुन्हा आरोपी रज्जक ने कळमना पोलीस ठाण्यात नोंद केला होता. Shocking incident
रज्जक यांची पहिली पत्नी आरती हिने विष प्राशन करीत आत्महत्या केली होती, त्यानंतर त्यांनी आरोपीने कौशल्या नामक महिले सोबत दुसरे लग्न केले होते. Nagpur crime news
मात्र दुसरी पत्नी ही रज्जक च्या मोठ्या मुलींला नेहमी त्रास द्यायची, कौशल्या चा भाऊ मृतक मुलीची छेडखानी करीत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करीत होता.
याबाबत तिने नातेवाईकांना सांगितले होते, पत्नी व तिच्या नातेवाईकांना अद्दल घडायला हवी यासाठी त्या मुलीकडून रज्जक ने सुसाईड नोट लिहून घेतली, तू आत्महत्या करण्याचा बनाव कर मग मी त्यांना बघतो असे त्या मुलीला सांगितले.
घरी कुणी नसताना रज्जक ने रूम मध्ये गळफास लावला व मुलीला गळफास घे असे म्हटले व लहान मुलीला फोटो काढण्यास सांगितले.
मोठ्या मुलीने गळफास घेतल्यावर रज्जक ने पायाने स्टूल ला लात मारली यामध्ये 16 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. Maharashtra crime
पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर रज्जक ने गुन्ह्याची कबुली दिली, पोलिसांनी रज्जक ला अटक केली आहे.
या घटनेपूर्वी त्या मुलीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र नागरिकांनी तिला रुग्णालयात दाखल केले म्हणून तिचा प्राण वाचला मात्र यावेळी स्वतःचा बापाने त्या मुलीला गळफास लावत फाशी दिली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने