मन हेलावणारी घटना, 14 महिन्याच्या मुलीला रेल्वेत बसवून बापाने काढला पळ

मन हेलावणारी घटना, 14 महिन्याच्या मुलीला रेल्वेत बसवून बापाने काढला पळ

Crime story's
नागपूर - 7 नोव्हेंम्बरला नागपूर रेल्वे स्थानकावर एका निर्दयी बापाने आपल्या 14 महिन्याच्या मुलीला रेल्वेत बसवून पळ काढला, ज्यावेळी पत्नीने त्याला मुलींबद्दल विचारले असता त्याने अपहरण झाल्याचा बनाव पत्नीला सांगितला, मात्र आईचे मन मानले नाही, तिने याबाबत नागपूर येथील शांती नगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. Nagpur crime
पोलिसांनी या प्रकरणात अधिक तपास केला असता हे सर्व कृत्य बापाने केलं असल्याचे उघडकीस झाले.
रायपूर, छत्तीसगड येथील कोसले कुटुंब कामाच्या शोधात चेन्नई ला गेला होता मात्र पत्नीच्या प्रसूती ची वेळ जवळ येत असल्याने तो कुटुंबासहित परतीचा प्रवास करीत होता. Nagpur railway station
रात्री नागपूर रेल्वे स्थानकात उतरल्यावर कोसले कुटुंब रेल्वे स्थानकावर थांबले, रात्री स्थानकावर काढली मात्र सकाळ होताच पत्नी चे लक्ष नसल्याने कृष्णकुमार कोसले यांनी आपल्या 14 महिन्याच्या जिज्ञासा ला सोबत नेत जबलपूर अमरावती एक्सप्रेस च्या जनरल कोच मध्ये नेऊन बसविले. Crime
रेल्वे स्थानकावरून सुटताच कृष्णकुमार रेल्वेत मुलीला ठेवून एकटा परतला, ज्यावेळी पत्नीने राजकुमार ला मुलीबद्दल विचारले असता एकाने मारहाण करीत मुलीला घेऊन गेले असे सांगितले. Shocking incident
त्यानंतर काही वेळ मुलीचा शोध घेतला मात्र तिचा काही पत्ता लागला नाही, आईला रडू कोसळत होत, त्यानंतर कोसले कुटुंब गावी परतले, मात्र कुटुंबाचा संशय कृष्णकुमार वर आला, आईचे मन न मानल्याने तिने याबाबत नागपूर येथील शांतीनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली.
पोलिसांनी कृष्णकुमार याला विचारणा केली असता त्याने आधी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसी खाक्या दाखविताच सदर कृत्य आपणच केलं असल्याची कबुली दिली.
आरोपीला सध्या अटक केली मात्र मुलीचा काही पत्ता लागला नाही, नागपूर पोलीस जिज्ञासा चा शोध घेत आहे, कुणालाही ती आढळली तर त्याबाबत पोलिसांना कळवावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

---------


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने