सेक्सटोर्शन द्वारे खंडणी वसूल करणाऱ्या मास्टरमाइंड ला अटक

सेक्सटोर्शन द्वारे खंडणी वसूल करणाऱ्या मास्टरमाइंड ला अटक

Crime storys
पुणे - देशभरात सध्या सेक्सटोर्शन चा धुमाकूळ माजला आहे, व्हिडीओ कॉल वर न्यूड व्हिडीओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेलिंग चे प्रकार यामधून वाढलेले आहे.
दत्तवाडी परिसरातील शुभम वाडकर या विद्यार्थ्याने आत्महत्या केली.

पुणे शहरात सध्या सेक्सटोर्शन चे प्रमाण वाढत असून यामध्ये आतापर्यंत हजारो नागरिक फसवणुकीला बळी पडले आहे.
वाडकर आत्महत्या प्रकरणी सदर गुन्ह्याचा तपासात पोलिसांना अनेक अडचणी आल्या मात्र धीर न गमावता पोलिसांनी वेशभूषा धारण करीत आरोपीला बेड्या ठोकल्या.
धक्कादायक बाब म्हणजे राजस्थान मधील अलवर जिल्ह्यातील गुरू कोठडी हे गाव सेक्सटोर्शन मध्ये अव्वल ठरले आहे.
पुण्यात आत्महत्या केलेल्या या प्रकरणाचा तपास करीत पोलीस गुरुकोठडी गावात पोहचले कुणी आपल्याला ओळखू नये यासाठी पोलिसांनी राजस्थानी वेषांतर केले होते.
अनवर सुभान खान या आरोपीला पोलिसांनी अटक करीत पुणे येथे आणले.
सदर सेक्सटोर्शन ची सुरुवात instagram वरील प्रीती शर्मा व प्रीत यादव हे बोगस अकाउंट वर नागरिकांशी चाट करीत त्यांची फसवणूक करतात.

नेमकं प्रकरण काय?

राज्यभरात ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनद्वारे खंडणी मागणाऱ्या मास्टरमाइंड आरोपीच्या दत्तवाडी पोलिसांनी राजस्थान मधून मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीच्या धमकीने एका तरुणाने इमारतीवरून उडी मारली होती.अन्वर सुबान खान (वय - 29, रा. गुरूगोठडी, ता. लक्ष्मनगढ, जि. अलवर, राज्य-राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे. फिर्यादी तरुणाला इन्स्टाग्राम अकाउंटवर (Instagram) त्यांच्या 19 वर्षीय लहान भावाचा अर्धनग्न फोटो पाठविण्यात आला होता. तो फोटो, व्हिडीओचा स्क्रिनशॉट (Screendshot) पाहिल्यानंतर लगेच आरोपीने तो डिलीट (Delete) केला. त्यानंतर तक्रारदाराच्या भावाच्या मैत्रीणीने फोन केला. त्यांच्या भावाला कोणीतरी इन्स्टाग्रामवरून न्युूड व्हिडीओ कॉल (Video Call) करून, ब्लॅकमेल करीत साडे चार हजार रुपये उकळल्याचे सांगितले. मात्र, तरीही आरोपीने संबंधित तरुणाला पैसे मागितले. बदनामीला कंटाळून तरुणाने 10 व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर तपास पथकाने तांत्रिक विश्लेषण करून आरोपीची माहिती काढून अटक केले.

आरोपीला कशी अटक केली?

आरोपी राजस्थान (Rajasthan) मध्ये असल्याचे समजताच पथकाने तेथे जाऊन त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीच्या नातेवाईकांनी आणि गावातील लोकांनी पोलिसांना विरोध करीत दगडफेक करुन पळवून लावले. मात्र, तरीही पथकाने तब्बल अडीच किलोमीटर पाठलाग करून जीवाची पर्वा न करता आरोपीला दत्तवाडी पोलीस पथकाने ताब्यात घेतले. राजस्थान गावातील सर्वाधिक मुले व महिला अशाप्रकारचे ऑनलाईन सेक्सट्रॉर्शनचे प्रशिक्षण घेवून नागरिकांना ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रमाण गुरूगोठडी ता. लक्ष्मणगढ जि. अलवर (राजस्थान) गावात मोठया प्रमाणात चालत असल्याचे दिसून आले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने