रिक्षा चालकाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

रिक्षा चालकाचे अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे

Crimestorys
औरंगाबाद - अल्पवयीन मुलगी रिक्शात बसली, मात्र चालकाने तिच्यासोबत अश्लील संवाद व चाळे करू लागला, रिक्षाचा वेग सुसाट झाला बाहेर निघायचे कसे असा विचार अल्पवयीन मुलीच्या डोक्यात सुरू झाला, मात्र कसलाही विचार न करता त्या मुलीने थेट चालत्या रिक्षातून उडी मारत आपला जीव वाचवला.

औरंगाबाद येथे दिवसाढवळ्या घडलेली ही घटना अंगावर शहारे आणणारी आहे. Molested
शहरातील गोपाल टी ते शिवाजी हायस्कूल परिसरात रिक्षातून प्रवास करणाऱ्या अल्पवयीन मुलीला रिक्षा चालक 39 वर्षीय सय्यद अकबर सय्यद हमीद याने अश्लील प्रश्न विचारण्यास सुरुवात करीत तिच्यासोबत गैरवर्तन करू लागला.
मुलगी रिक्शात एकटी असल्याने सय्यद ची हिंमत वाढली, मुलीने रिक्षातून उतरण्याचा प्रयत्न केला असता सय्यद ने रिक्षाचा वेग वाढविला. Maharashtra crime
17 वर्षीय मुलीने प्रसंगावधान दाखवीत चालत्या रिक्षातून उडी घेतली, हा सर्व थरारक प्रसंग सीसीटीव्ही मध्ये कैद झाला.
मुलगी रिक्षातून पडल्याने नागरिकांनी धाव घेतली, तिला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, त्या मुलीच्या डोक्याला इजा झाली होती.
पोलिसांनी मुलीचे बयान घेत सय्यद चा शोध घेत त्याला अटक केली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने