अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई

Crime story's
पुणे - शहरात मादक पदार्थाची विक्री दिवसेंदिवस वाढत असून पोलिसही आता यावर करडी नजर ठेवून आहे, अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने आता कम्बर कसली आहे. Drugs mafia
बुधवारी पथकाने बुधवार पेठ आणि पुणे स्थानक परिसरात मोठी कारवाई केली. Narcotics

पुणे शहरात अंमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी आरोपिकडून 2 लाख 76 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. Maharashtra narcotics
बुधवार पेठेतील क्रांती चौक, मगर गल्ली येथे जाहिदुल मोतेहर मलीक ऊर्फ आकाश मंडल (वय. २४,रा. भोई गल्ली बुधवार पेठ) हा अंमली पदार्थाच्या गोळ्या विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन तपासणी केली असता त्याच्याकडे अंमली पदार्थाच्या गोळ्या सापडल्या. त्याच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Pune crime
बंडगार्ड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुणे रेल्वे स्थानकाजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरून आल्या असून, त्या अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी थांबल्याची माहिती पथकाला मिळाली होती. त्यानुसार अलफाहाद वजीर सय्यद (वय २७, रा. सेन्ट्रल स्ट्रिट कॅम्प), शहारुख बाबु शेख (वय २९, रा. एमआयबीएम रस्ता, कोंढवा) या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता, दोन लाख रुपये किंमतीचे Mephedrone (MD) मॅस्केलाईन, दुचाकी, मोबाइल असा २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दोघांविरुद्ध अमली पदार्थ विरोधी कायद्यानुसार बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने