मटण विक्रीच्या वादात एकाची हत्या

मटण विक्रीच्या वादात एकाची हत्या

Crime story's
औरंगाबाद - मटण विक्रीच्या वादावरून तिघांनी मिळून एकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. maharashtra crime
पिसादेवी रोडवर मृतक 35 वर्षीय अश्फाक युसूफ शहा या तरुणाचे मटण विक्रीचे दुकान होते, अश्फाक हा कुटुंबासाहित मिसारवाडी येथे राहत होता. Crime murder
अश्फाक चे मटण विक्रीचे दुकान अल्पावधीतच चांगले चालत होते, मात्र ही बाब उर्वरित मटण विक्रेत्याना खुपत होती. 
काही महिन्यापूर्वी अश्फाक व आरोपी Meat sales मध्ये वाद झाला होता, मटण विक्रीचे दुकान अश्फाक ने दुसरीकडे स्थलांतरित करावे अशी धमकी देण्यात आली होती.
रविवारी नेहमीप्रमाणे अश्फाक ने दुकान सुरू केले असता आरोपीनी अश्फाक सोबत वाद घातला वाद इतका वाढला की अश्फाक च्या छातीत मटण कापण्याचा सुरा भोसकला.
रक्ताच्या थारोळ्यात अश्फाक जमिनीवर कोसळला नागरिकांनी तात्काळ अश्फाकला रुग्णालयात दाखल केले मात्र अति रक्तस्राव झाल्याने डॉक्टरांनी अश्फाकला मृत घोषित केले.
घटनेनंतर आरोपीनी जालना कडे पळ काढला मात्र सिडको पोलिसांनी आरोपी अब्दुल सलाम गुलाम कुरेशी, अब्दुल कलाम गुलाम कुरेशी व सय्यद गुलाम कुरेशी यांना अटक केली.
पुढील तपास सिडको पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने