अधिकाऱ्याच्या पत्नीने घेतला गळफास

अधिकाऱ्याच्या पत्नीने घेतला गळफास

Crime story's
लातूर - अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीने आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ माजवली आहे.
45 वर्षीय स्नेहलता प्रभू जाधव असे त्यांचे नाव आहे.
सदर घटना रविवारी घडली असून आत्महत्येपूर्वी स्नेहलता यांनी नातेवाईकांना फोन करून आपण आत्महत्या करणार अशी माहिती दिली होती.
स्नेहलता यांच्या मुलाचे 18 डीसेम्बरला लग्न होते, लग्नाची खरेदी करण्यासाठी जाधव कुटुंब कर्नाटक येथे गेले होते, मात्र रात्री उशिर झाल्याने सोलापुरातील सोरेगाव मधील एका हॉटेलमध्ये स्नेहलता या थांबल्या, रविवारी सकाळच्या सुमारास प्रभू जाधव निघून गेले. Officer's wife commits suicide
दुपारच्या सुमारास स्नेहलता यांनी नातेवाईकांना फोन करीत आत्महत्या करणार असे सांगितले, त्यावेळी स्नेहलता या जोरजोरात रडत होत्या, त्यांनी आत्महत्या न करावी यासाठी नातेवाईकांनी समजूत काढली मात्र त्या समजण्याच्या मनस्थिती मध्ये नव्हत्या, काही नातेवाईक तात्काळ हॉटेलमध्ये पोहचले त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता तोपर्यंत खूप वेळ झाली होती.
स्नेहलता या हॉटेलमध्ये साडीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत होत्या, त्यांना खाली उतरवीत नातेवाईकांनी तात्काळ रुग्णालयात नेले मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. Maharashtra crime
त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणाने केली याबाबत काही माहिती मिळाली नसून घटनेचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने