आधी पत्नीला जिवंत जाळले नंतर केली हत्या

आधी पत्नीला जिवंत जाळले नंतर केली हत्या

Crime story's
उत्तरप्रदेश - कानपुर येथील ग्रामीण भागात एका महिलेचे अर्धवट जळलेला मृतदेह शेतात मिळाल्याने एकच खळबळ उडाली.
महिलेचा मृतदेह मिळाल्याची बातमी वाऱ्यासह पसरली, नागरिकांनी त्या शेतावर गर्दी केली, याबाबत पोलिसांना सूचना देण्यात आली असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळाचा पंचनामा करीत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन साठी रुग्णालयात पाठविला.
सदर घटना ही मंगळपुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली, पोलिसांनी अधिक तपास केला असता सदर महिलेचे नाव सरला असून ती जगदिशपूर या गावात पती व कुटुंबियांसोबत राहत होती.
मृतक सरला यांच्या भावाने सरळ मृतकाचे पती बलबीर यांच्यावर सरला ची हत्या केल्याचा आरोप लावला. Shocking crime
मागील काही दिवसापासून बलबीर व त्याचे कुटुंबीय सरला ला त्रास देत होते, सरला ही रात्री च्या सुमारास पती बलबीर सोबत बाहेर निघाली होती, मात्र ती घरी परत आली नाही, बलबीर सुद्धा परत आला नसून त्याचा मोबाईल स्विच ऑफ मोडवर आहे. Up crime
पोलिसांनी प्राथमिक अंदाज लावत मृतक सरला ला जिवंत जाळत तिला ठार मारले अशी शक्यता वर्तविली आहे.
मृतक सरला यांच्या कुटुंबीयांनी तक्रार दाखल करीत बलबीर यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला असून बलबीर चा शोध सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने