स्वतःला पेटवित प्रेयसी ला मिठी मारणाऱ्या प्रियकराचा मृत्यू

स्वतःला पेटवित प्रेयसी ला मिठी मारणाऱ्या प्रियकराचा मृत्यू

Crime story's
औरंगाबाद - श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर औरंगाबाद जिल्ह्यात धक्कादायक घटना 21 नोव्हेंम्बरला उजेडात आली होती.
प्रियकराने स्वतःला पेटवित प्रेयसीला मिठी मारली, या घटनेत प्रियकर हा 95% भाजला रात्री उपचारादरम्यान प्रियकराचा मृत्यू झाला, प्रेयसी वर अजूनही उपचार सुरूच आहे.
प्रियकर गजानन मुंडे व पूजा साळवे यांची ओळख मैत्रीत व नंतर प्रेमात बदलली मात्र कालांतराने दोघांमध्ये वाद निर्माण झाले, गजानन हा अभ्यासात हुशार विद्यार्थी होता तर पूजा ला प्राध्यापक बनायचं होत, मात्र त्याआधी सार काही संपलं. Maharashtra crime
पूजा व गजानन दोघेही जीवभौतिकशास्त्र या एकाच विषयात पीएचडी करत होते. गजानन मुंडे आणि पूजा साळवे हे दोघे शासकीय न्याय सहाय्यक विज्ञान संस्था या कॉलेजमध्ये आले होते. त्यावेळी दोघांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला. त्यानंतर प्रियकर गजानन मुंडे याने अंगावर पेट्रोल टाकून स्वत:ला पेटवून घेतलं. त्यानंतर प्रेयसीला मिठी मारली. या घटनेमध्ये दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मृत्यूपूर्वी काय म्हणाला गजानन?

पूजाने माझ्याशी लग्न केलं होतं. नंतर तिने विश्वासघात केला मी तिच्यावर आतापर्यंत दोन ते अडीच लाख रुपये खर्च केले आहे. पण तरीही सुद्धा ती माझ्यासोबत राहत नाही. मला सारखं टाळते, पोलिसांकडे तिने तक्रार सुद्धा दिली होती. मी तिच्यावर खरं प्रेम केलं होतं. पण तिने ते ओळखलं नाही. त्यामुळे आपणही जगायचं नाही, तिलाही जिवंत ठेवणार नाही असा निर्णय घेऊन स्वत:ला पेटवून घेतलं, असा जबाब गजानन मुंडे याने मृत्यूपूर्वी पोलिसांना दिला.

पुजाची आई म्हणते...

गजानन हा नेहमीच त्रास देत होता. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा दिली होती. माझा तो पाठलाग करायचा. माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करायचा. मी त्याची समजूत काढली. पण त्याने माझे काही ऐकले नाही, असा जबाब जखमी पूजाने दिला आहे. पूजाही शेतकरी कुटुंबातून आली. प्राध्यापक होण्याचं स्वप्न उराशी बाळगून ती औरंगाबादला आली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने