महाराष्ट्रात प्रेम आणि दिल्लीत प्रियकराने प्रेयसीचे केले 35 तुकडे

महाराष्ट्रात प्रेम आणि दिल्लीत प्रियकराने प्रेयसीचे केले 35 तुकडे

Crimestorys
दिल्ली - आधी डेटिंग ऐप वरून मैत्री नंतर प्रेम आणि त्या प्रेमाचे रूपांतर क्रूर हत्याकांडात झाले, या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला.
ही कहाणी आहे वसई येथे राहणाऱ्या श्रद्धा वालकर ची, श्रद्धा ही वसई मधील संस्कृती सोसायटीमध्ये आपले आई-वडील व भावासोबत राहत होती. Brutal murder

वर्ष 2019 मध्ये श्रद्धा कॉल सेंटर मध्ये काम करीत होती, त्यावेळी dating app वरून श्रद्धा ची ओळख आफताब पुनावाला सोबत झाली.
त्याचवर्षी श्रद्धाने आफताब व त्याच्या प्रेमा बद्दल घरच्यांना सांगितले मात्र वालकर कुटुंबीयांनी त्याला विरोध दर्शविला. Delhi crime
त्यानंतर घरच्यांचा विरोध न जुमानता ती वसई येथील नायगाव मध्ये आफताब सोबत लिव्ह इन रिलेशन मध्ये राहायला गेली.
कोविड च्या पहिल्या लाटेत श्रद्धा च्या आईचा मृत्यू झाला, त्यानंतर श्रद्धा घरी परतली, काही दिवस राहिल्यावर श्रद्धा पुन्हा आफताब कडे रहायला गेली.
श्रद्धा व आफताब मार्च 2022 मध्ये दिल्ली शिफ्ट झाले, पण श्रद्धा कॉलेजचा मित्र लक्ष्मण नाडर याच्या संपर्कात होती, ती आफताब सोबत आनंदी नव्हती, तो तिला नेहमी त्रास द्यायचा असे अनेकदा श्रद्धाने लक्ष्मण ला सांगितले होते.
मे महिन्यानंतर श्रद्धा चा सम्पर्क लक्ष्मण सोबत झाला नाही, तिला काही झाले तर नाही असा संशय लक्ष्मणाला आला, त्याने 6 ऑक्टोबर 2022 ला वसई पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला, पोलिसांनी पुढील तपास करण्यासाठी तो अर्ज माणिकपूर पोलिसांकडे वर्ग केला, गुन्हे शाखेने श्रध्दाच्या वडिलांना श्रद्धा मिसिंग असल्याची तक्रार दाखल करायला लावली, त्यानंतर पोलिसांचा तपास सुरू झाला.
आफताब ची चौकशी केली असता मे महिन्यात श्रद्धा व माझं भांडण झाले होते, त्यानंतर ती कुठं गेली याबाबत मला काही माहिती नाही असे पोलिसांना सांगितले.
पोलिसांना आफताब चा संशय आला, त्यानंतर 9 नोव्हेंम्बरला दिल्ली येथील मेहरावली पोलीस ठाण्यात श्रद्धा मिसिंग असल्याची तक्रार दाखल करण्यात आली.
मेहरावली पोलिसांनी आफताब ची कसून चौकशी केली असता, श्रद्धा वारंवार लग्नाचा तगादा लावत त्यामुळे कंटाळून मी तिची हत्या केली.
इतकेच नव्हे आफताब ने श्रद्धा चे 35 तुकडे केले होते, त्यानंतर त्याने 300 लिटर च्या फ्रीज मध्ये श्रद्धा चे तुकडे 15 दिवस ठेवले.
प्रत्येक दिवशी आफताब श्रद्धा चे 1 ते 2 तुकडे दिल्ली येथील वेगवेगळ्या ठिकाणी फेकत होता, 16 मे रोजी आफताब व श्रद्धा चा लिव्ह इन रिलेशन चा वाढदिवस होता, त्याच सेलिब्रेशन करून 19 मे ला आफताब ने श्रद्धा ची हत्या केली.
आफताब हा कॉल सेंटर मध्ये काम करण्याआधी मुंबई येथील हॉटेलमध्ये शेफ म्हणून काम करीत होता, मासांचे तुकडे कसे करायचे हे आफताब ला माहीत होते.
श्रद्धा चा मित्र लक्ष्मण याला संशय आला म्हणून त्याने याबाबत तक्रार दाखल केली, लक्ष्मण मुळे हे क्रूर हत्याकांड उघडकीस आले.
-----------------



टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने