क्रूर दुहेरी हत्याकांड - हत्येत केला फेव्हीक्विक चा वापर

क्रूर दुहेरी हत्याकांड - हत्येत केला फेव्हीक्विक चा वापर

Crime story's
राजस्थान - सध्या देशात क्रूर हत्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होत आहे, असेच एक क्रूर व धक्कादायक प्रकरण उदयपूर मध्ये उघडकीस आले.
एका मांत्रिकाने प्रियकर व प्रेयसीला शारीरिक संबंध प्रस्थापित करायला सांगितले त्यानंतर दोघांच्या अंगावर फेव्हीक्विक टाकले जोडप्याला काही समजायच्या आत चाकू व दगडाने वार करीत हत्या केली. Rajasthan crime
18 नोव्हेंम्बरला पोलिसांना शासकीय शिक्षक राहुल व सोनू कुंवर यांचे मृतदेह सापडले होते, मृतदेहाच्या अंगावर एकही कपडे नव्हते.
घटनेचा तपास आव्हानात्मक असल्याने पोलिसांनी परिसरातील तब्बल 50 सीसीटीव्ही व 200 नागरिकांचे बयान नोंदविले त्यानंतर 72 तासात पोलिसांनी आरोपीला अटक केली.
या प्रकरणी पोलिसांनी मांत्रिक भालेक कुमार याला हत्याप्रकरणी अटक केली.
मांत्रिक भालेक हा मागील 7 ते 8 वर्षांपासून समस्या दूर करण्याच्या नावावर नागरिकांना ताविज देत होता. Brutal murder
त्यावेळी सोनू कुंवर व राहुल याचे कुटुंबीय भालेक कुमार यांच्याकडे येत होते, तेव्हा राहुल व सोनू यांची ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते.
राहुलचे विवाहबाह्य संबंध असल्याकारणाने तो आपल्या पत्नीशी नेहमी भांडत होता, त्यानंतर राहुल च्या पत्नीने मांत्रिक भालेक सोबत सम्पर्क साधत मदत मागितली, भालेक ने राहुल च्या विवाहबाह्य संबंधाची पूर्ण माहिती त्याच्या पत्नीला दिली.
सदर बाब राहुल व सोनू ला कळली दोघांनी भालेक ला धमकी दिली, भक्त व समर्थकांमध्ये आपली बदनामी होणार अशी भीती भालेक च्या मनात भरली.
दोघांपासून सुटका मिळावी यासाठी मांत्रिक भालेक ने क्रूर कट रचला.
त्याने आधी 50 पॉकेट फेव्ही क्विक घेतले, ते सर्व एकत्रित करीत बॉटल मध्ये भरले.
त्यानंतर राहुल व सोनू एकत्र यावे यासाठी मी दोघांची मदत करतो असे सांगत दोघांना बोलावणे केले, त्यासाठी दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित करावा अशी गळ भालेक ने दोघांसमोर ठेवली.
दोघांनी शारीरिक संबंध प्रस्थापित केले त्या अवस्थेत भालेक ने फेव्हीक्विक ची बॉटल दोघांच्या अंगावर टाकली, काही समजण्याआधी दोघांनी एकमेकांपासून वेगळे करण्याचा प्रयत्न केला मात्र ते चिकटले, काही समजण्याआधी मांत्रिक भालेक ने दगड व चाकूने दोघांवर हल्ला केला.
या हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला, दोघांचा मृतदेह नग्नावस्थेत होता.
पोलिसांनी या प्रकरणी कसून तपास केला अखेर मांत्रिक भालेक ला अटक करण्यात आली.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने