शिवसेना महिला शहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला

शिवसेना महिला शहर प्रमुखावर प्राणघातक हल्ला

Crime Story
वाशीम - राजकारणात शिवसेना पक्षाचे विभाजन झाल्यावर दोन्ही गट एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडताना दिसत आहे. Shivsena uddhav thackeray group
मात्र अश्यात वाशीम शहर महिला प्रमुखावर अज्ञाताने चाकूने हल्ला केल्याची खळबळ जनक घटना उघडकीस आली आहे.
शिवसेना-उद्धव ठाकरे गटाच्या वाशीम शहर महिला प्रमुख रंजना पौळकर ह्या गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान आपल्या मैत्रिणी सोबत बाजारात जात असताना अज्ञाताने त्यांच्यावर चाकू हल्ला केला. Washim crime
भर रस्त्यात पौळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यात त्या गंभीररीत्या जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
विशेष म्हणजे ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर व वर्दळीच्या ठिकाणी त्यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. Maharashtra crime
त्यांच्यावर हल्ला कुणी व का केला याबाबत अजून स्पष्ट माहिती मिळालेली नाही.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने