5 वर्षीय ईश्वरीच्या हत्येची आरोपी निघाली चुलत बहीण

5 वर्षीय ईश्वरीच्या हत्येची आरोपी निघाली चुलत बहीण

Crime story's
जालना - 28 नोव्हेंम्बरला चौधरी नगर परिसरात 5 वर्षीय ईश्वरी रमेश भोसले या मुलीचा रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह आढळला होता.
सदर चिमुकलीची निर्घृणपणे हत्या कुणी केली? याबाबत पोलिसांनी सखोल तपास केला असता 5 वर्षीय चिमुकलीची हत्या 14 वर्षीय अल्पवयीन मुलीने केली असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. Jalna crime
ईश्वरी ही आपल्या काकांकडे शिक्षणासाठी आली होती, मात्र त्याठिकाणी तिचा क्रूर अंत होणार याची कुणाला कल्पनाही नव्हती. Brutal murder
28 नोव्हेंम्बरला ईश्वरी ही अंघोळीसाठी केली होती, बाथरूम मध्ये ईश्वरी च्या चुलत बहिणीने ब्लेडने तिच्या चेहऱ्यावर, हातावर व गळ्यावर वार केले यामध्ये ईश्वरी चा जागीच मृत्यू झाला होता.
जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी वडते यांनी चिमुकलीची हत्या कोणत्या कारणाने झाली ही बाब तपासातून स्पष्ट केली. Maharashtra crime news
ईश्वरी ची 14 वर्षीय चुलत बहिणीने काही दिवसांपूर्वी शाळेत मुख्याध्यापकाचा मोबाईल चोरला होता, त्याबाबत शाळेत सर्वाना माहीत झाले, त्यामुळे अल्पवयीन मुलगी काही दिवसांपासून शाळेत जात नव्हती, मुलीचे आई वडील ती शाळेत जावी यासाठी सतत तगादा लावत होते.
त्यामुळे त्या मुलीच्या मनात राग अनावर झाला, पण तो राग तिने 5 वर्षाच्या ईश्वरी वर काढला, रागाच्या भरात ईश्वरी ची हत्या केली असा कबुलीजबाब त्या 14 वर्षीय मुलीने दिला.
सध्या आरोपी मुलीला बालसुधारगृहात पाठविण्यात आले आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने