वृद्धाची हत्या करीत 7 लाखांचा ऐवज पळविला

वृद्धाची हत्या करीत 7 लाखांचा ऐवज पळविला

Crime story's
नाशिक - 25 नोव्हेंबर च्या रात्री अंबड लिंक रोड परिसरात 65 वर्षीय वृद्धाची हत्या करीत सशस्त्र दरोडा टाकल्याची घटना घडली. Robbery
शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीमध्ये राहणारे 65 वर्षीय जगन्नाथ कर्डीले रात्री घरी एकटे होते. Maharashtra crime
याचा फायदा घेत दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला, घरात कुणीतरी आलं असा भास झाल्यावर कर्डीले यांनी जाऊन बघितले असता तोंडावर कापड असलेल्या दरोडेखोरांना बघितल्यावर कर्डीले यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला मात्र एकाने कर्डीले यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले.
या हल्ल्यात कर्डीले यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यानंतर दरोडेखोरांनी घरातील दागिने व रोख असा एकूण 7 लाखांचा ऐवज लंपास करीत तिथून पळ काढला.
सदर घटनेची माहिती होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, सध्यातरी अज्ञात दरोडेखोरांचा शोध सुरू असून पुढील तपास अंबड पोलीस करीत आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने