प्रियकराने स्वतःला पेटवित प्रेयसीला मारली मिठी

प्रियकराने स्वतःला पेटवित प्रेयसीला मारली मिठी

Crime story's
औरंगाबाद - देशातील श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर अनेक थरारक घटना उघडकीस होत आहे, काय झालंय आजच्या पिढीला ज्यामुळे इतके भयावह गुन्हे घडत आहे? हा सध्या अनुत्तरित राहिलेला प्रश्न आहे.
महाराष्ट्र मधील औरंगाबाद जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परिसरात प्रियकराने स्वतःला पेटवून प्रेयसी ला मिठी मारल्याची घटना घडली आहे.
या घटनेत दोघे जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. Maharashtra crime
गजानन मुंडे व पूजा साळवे अशी दोघांची नावे आहे, दोघे विद्यापीठातील झुलॉजी विभागात संशोधक विद्यार्थी आहे. Shocking incident
आज दोघेही विज्ञान संस्थेत आले असता दोघांमध्ये वाद झाला, त्यानंतर प्रियकर गजानन ने स्वतःचा अंगावर पेट्रोल ओतत पेटवले, त्यांनतर त्याच अवस्थेत प्रेयसी पूजा ला मिठी मारली.
या घटनेत दोघेही गंभीररीत्या जखमी झाले असून त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. Love affair
गजानन ने असे भयावह पाऊल का उचलले याबाबत अजूनही अस्पष्टता आहे, पुढील तपास पोलीस करीत आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने