भरधाव वेगात असणाऱ्या एसटी बसवर युवकाने मारली उडी

भरधाव वेगात असणाऱ्या एसटी बसवर युवकाने मारली उडी

Crime storys
बीड - जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यात 32 वर्षीय युवकाने ट्रॅक्टर मधून धावत्या बसवर उडी मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
बॉलिवूड चित्रपटाप्रमाणे केलेला हा स्टंट मात्र युवकाच्या जीवावर बेतला. Deadly Stunt
माजलगाव मार्गावरील शृंगारवाडी फाट्याजवळ 2 ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रॅक्टर ला एसटी बसने ओव्हरटेक केले, मात्र बस ओव्हरटेक करीत असताना ट्रॉली वर बसून असणाऱ्या 32 वर्षीय गजानन मारुती बनाईत याने भरधाव वेगात असणाऱ्या बसवर उडी मारली, मात्र त्यावेळी त्याचा तोल गेल्याने तो बसवर धडकत रोडवर आदळला. Beed crime
गजानन याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तो रस्त्यावर गतप्राण झाला.
गजानन रस्त्यावर आदळून पडल्याने ट्रॅक्टर चालकाने तिथून पळ काढला, त्याने का पळ काढला यावर पोलिसांनी संशय व्यक्त केला असून सदर घटना आत्महत्या किंवा घातपात तर नाही या बाबीवर पोलीस तपासाला लागले आहे. Maharashtra crime news
पोलिसांनी याबाबत मंगळवारी मध्यरात्री गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने