अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत फोटो ठेवले व्हाट्सएप स्टेट्सवर

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत फोटो ठेवले व्हाट्सएप स्टेट्सवर

Crime story's
उत्तरप्रदेश - राज्यातील अतरातील दौरान गावात एका नराधमाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत फोटो आणि व्हिडीओ काढले, विकृतीचा कळस म्हणजे अत्याचार करतानाचे फोटो त्या नराधमाने whatsapp status वर ठेवले.

अल्पवयीन मुलगी कामावर जात असताना आरोपीने तिला अडवीत बाजूच्या शेतात नेत तिच्यावर अत्याचार केला, त्या दरम्यान त्याने अत्याचाराचे फोटो आणि व्हिडीओ सुद्धा काढले.
आरोपीच्या तावडीतून मुलीने सुटका करीत सर्व प्रकाराची माहिती कुटुंबियांना दिली, पीडित मुलीच्या कुटुंबाने याबाबत पोलिसात तक्रार दिली.
तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी तात्काळ त्या नराधमाला अटक केली, पीडित व आरोपी हे दोघेही एकाच गावातील असल्याने ते एकमेकांना ओळखत होते. Minor girl rape
काही दिवसांपूर्वी असाच एक प्रकार त्या गावात घडला होता, मुलीवर अत्याचार करून आरोपीनी अत्याचाराचे फोटो व व्हिडीओ व्हाट्सएप स्टेटस वर ठेवले होते.
वारंवार होणाऱ्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली असून अश्या नराधमांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने